ईद मुबारक
"ईद मुबारक" मुस्लिम बंधू भगिनींच्या अतुलनीय सहकार्याने *इचलकरंजीतल्या मुस्लीम समाजाच्या मदतीने उभारला अतीदक्षता विभाग* *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन* * मुस्लिम समाजाने आदर्श निर्माण केला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* *कोल्हापूर,दि.२५ कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले.* इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील ...
Comments
Post a Comment