डॉ. पंजाबराव देशमुख
डॉ. पंजाबराव देशमुख
डॉ.भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म 1898 मध्ये झाला. ते अमरावती येथिल पापळ गावात एका शेतक-याच्या घरी जन्;माला आले. त्यांनी शाळेचे शिक्षण पापळ येथे व नंतर अमरावती येथे पूर्ण केले. त्यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले. त्यांच्या संशोधनाचा ” धर्म पहाट आणि त्याची वाढ ” असा विषय होता. त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. १९३० मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. त स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले. १९५२, १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्तीच झाली. तसेच ते १९५२ ते १९६२ पर्यंत कृषी मंत्री होते. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी ” भारत कृषक समाज” स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यातसाठी एक वृत्तपत्र म्हणजे ” महाराष्ट्र केसरी ” सुरु केली. अशा महान व्यक्ती चे सन १९६५ मध्येा निधन झाले.
डॉ. पंजाबराव देशमुखांचे विचार प्रेरणादायी -न्या. सिरपूरकर
भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी केले. अमरावतीच्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष
भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी केले. अमरावतीच्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११४व्या जयंतीनिमित्त धनवटे नॅशनल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे याप्रसंगी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
आदर्श माणूस घडविणारे तसेच तरुण पिढीला प्रेरणादायी असे व्यक्तिमत्त्व भाऊसाहेबांचे होते. त्यांचे विचार प्रेरणादायी व लोकाभिमुख आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये सर्वसमावेशक तत्त्वांचा विचार होता. शैक्षणिक, सामाजिक कृती करताना या तत्त्वांचा अवलंब करण्याची गरज आहे, असे सिरपूरकर म्हणाले. सत्य व मानवता यांचे महत्त्व विशद करीत त्यांनी न्यायाची व्याख्या सांगितली. डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, वाचन व व्यासंग जोपासल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. व्यासंग व वाचन केल्यानेच महापुरुष घडले. भाऊसाहेबांचे विचार अंमलात आणले असते तर एकाही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली नसती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर एक आदर्श ठेवावा. महापुरुषांच्या चारित्र्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करून व्यक्तिमत्त्व घडविणे, हीच भाऊसाहेबांना आदरांजली ठरेल, असे डॉ. तायवाडे म्हणाले. भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी, पुष्परचना, मेहंदी, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, गायन, भित्तीपत्र, घोषवाक्य, हस्ताक्षर आदी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्घामधील यशस्वी तसेच खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. पी. एस. चंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. भारती खापेकर यांनी तर डॉ. कल्पना देशमुख यांनी आभार मानले.Popular Post Links
हमारे "Blog" का मकसद आपके लिए अच्छे article search करके लिखना और लोगो को Motivate करना हैं।
अगर आप को हमारी पोस्ट अच्छी लगती है तोह कमेंट करके
ज़रूर बताएं और अपने दोस्तों के साथ share जरूर करें।
अगर आपके पास हिंदी मैं कोई article , Inspirational Story, News, या जानकारी है जो आप हमारे साथ
share करना चाहते हैं तो कुर्पया उसे अपनी फोटो के साथ E-mail करे हमारी Id है danishkhan339@gmail.com पसंद आने पर हम आपके नाम के साथ यहाँ Publish करेंगे
Appko Ye Article kaisa laga Comment kar ke zaroor bataine
Important
Agar Apki Koi Shop hai, store hai, shopping portal hai, app hai, Inshorance company, ya ap kisi company ke ajant hai, Hotals hai, bankin suvidha ho, ya banking loan ke bare me, aur anay koi bhi suvidha hai in sab ke alawa aur aap uski Advertisment karna chahte ho toh App hamse contact karsakte hai hame facebook ,facebook group, facebook page, twitter per follow karsakte hain.
Comments
Post a Comment