Enimals Information in Marathi
Enimals Information in Marathi चित्ता चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता , त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते . चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून हिंदीत चिता व मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात . आढळ एकेकाळी चित्ता हा अाफ़्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता , परंतु आज चित्त्याचे आढळस्थान केवळ अाफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते मर्यादित राहिले आहे . याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतिस्थान . चित्त्याचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले . तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला . चित्त्याने उत्क्रांतीमध्ये वेग मिळवला खरे परंतु त्याने शारीरिक ताकद गमावली . त्यामुळे बहुतेक वेळा चित्ता त्याच्या पिलांचे इतर भक्षकांपासून अथवा त्याने म...