Enimals Information in Marathi

Enimals Information in Marathi


चित्ता


चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून हिंदीत चिता मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.

आढळ

एकेकाळी चित्ता हा अाफ़्रिका युरेशिया भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता, परंतु आज चित्त्याचे आढळस्थान केवळ अाफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते मर्यादित राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतिस्थान. चित्त्याचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे त्यावर शेती इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला. चित्त्याने उत्क्रांतीमध्ये वेग मिळवला खरे परंतु त्याने शारीरिक ताकद गमावली. त्यामुळे बहुतेक वेळा चित्ता त्याच्या पिलांचे इतर भक्षकांपासून अथवा त्याने मिळवलेल्या भक्ष्याचे रक्षण करू शकत नाही. त्यामुळे चित्त्याची संख्या बऱ्याच ठिकाणी कमी झाली. भारतातील चित्त्याला अशियाई चित्ता म्हणत. त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. चित्त्याची बंदिवासात वीण होत नाही असा अनुभव आहे. भारतातील शेवटचा जंगली चित्ता १९५१ मध्ये आंध्रप्रदेशात दिसला. यानंतर भारतातून जंगली चित्ता दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला आहे. महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत आशियाई चित्त्याची आज केवळ इराणमध्ये जवळपासपन्नास इतकी संख्या राहिली आहे. अधूनमधून बलुचिस्तानमध्ये चित्ता दिसण्याच्या घटना घडतात.
अाफ़्रिकेतील मुख्यत्वे सव्हानाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्त्याचे अस्तित्व आहे. जेथे खाद्याची मुबलकता आहे, अशा भागात अजूनही चित्ते आढळतातकेनियाझिंबाब्वेबोटस्वानादक्षिण आफ्रिकानामीबियायुगांडा इत्यादीदेशांत चित्ता आढळतो.

वर्णन


चित्त्याच्या अंगावरचे ठिपके भरीव असतात चेहऱ्यावरील अश्रूंसारख्या दिसणाऱ्या रेषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. चित्त्याचे ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे बिबट्या आणिचित्त्यामध्ये लोक नेहेमी गफलत करतात. परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फरक आहे. चित्त्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे आतून पोकळ असतात. चित्त्याचे ठिपके हे ते सें.मी. व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात. पोट पायांचे आतील भागांवर ठिपके नसतात. चित्त्याच्या चेहऱ्यावर दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणाऱ्या अश्रूंप्रमाणे दिसतात. बाकी शरीरयष्टीमध्ये दोघांमध्ये बराच फ़रक आहे. बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते, तर चित्त्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते. चित्त्याची छाती ही खोलवर कंबर अतिशय बारीक असते. पाय अतिशय लांब सडक लवचीक असतात. चित्त्याचे वजन साधारणपणे ४० किलोग्रॅमपर्यंत भरते. त्याची लांबी सव्वा ते .३५ मीटरपर्यंत भरते. चित्त्याची शेपटी साधारणपणे ८४ सें.मी.पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्त्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो. चित्त्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचया नख्या. चित्त्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पूर्णपणे आत घेता येत नाही. ती अर्धवट बाहेर अर्धवट आत घेता येतात. तर मांजरांना पूर्णपणे आत बाहेर करता येतात. याचा फायदा चित्यांना अतिवेग घेण्यास झालेला आहे.
चित्ता हा लांबी रुंदीत मांजरांमध्ये मोठ्या आकारात येत असला तरी तो पँथेरा उपकुळात येत नाही. त्याचे कारण चित्त्याला डरकाळी फोडता येत नाही, तसेच गुरगुरता देखील येत नाही. चित्ता केवळ लहान मांजरांप्रमाणे क्यांव क्यांव करू शकतो.
अतिवेगासाठी सक्षम होण्यास चित्त्यामध्ये मोठ्या नाकपुड्या, मोठी फुप्फुसे वेगाने पळू शकणारे हृदय विकसित झाले आहे.

आहार शिकार पद्धत

चित्ता हा मांसभक्षक असून त्याच्या आहारात छोट्या हरिणांचा समावेश होतो. अाफ़्रिकेत मुख्यत्वे इंपाला, विविध प्रकारचे गॅज़ेलस्प्रिंगबक हे त्याचे खाद्य आहे. तो कधीकधी झेब्रा किंवा वाईल्ड बीस्ट अशा मोठ्या प्राण्यांचीही शिकार करण्यात यश मिळवतो. चित्त्याचे अतिशय वेगवान होण्याचे कारण त्याचे खाद्य आहे. हरणे ही देखील अतिशय वेगाने पळू शकतात त्यांना गाठण्यासाठी चित्त्याला अतिवेग मिळवावा लागला आहे.
चित्ता साधारणपणे दिवसा शिकार साधतो. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उन्हे कलल्यानंतर तो शिकार साधतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो शिकार करणे टाळतो. दुरून शिकार टेहळल्यावर भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ दबा धरून जातो भक्ष्य साधारणपणे १० ते २० मीटरवर आल्यावर तो जोरदार वेगवान चाल करतो. चित्त्याची ही चाल पाहणे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अनेक छायाचित्रकार चित्त्याचा हा क्षण टिपण्यास आतुर असतात. चित्ता कधी लांबवर खूप काळ पाठलाग करत नाही. चित्याला वेग असला तरी लांबवर पाठलाग करण्याचे बळ त्याच्यापाशी नसते. साधारणपणे ते दीड मिनिटापर्यंत पाठलाग करून शिकार साधतो. नाही जमल्यास शिकारीचा नाद तात्पुरता सोडून देतो. पाठलाग करताना चित्ता आपल्या भक्ष्याला सरळसरळ गळा पकडून ठार मारत नाही. पाठलागादरम्यान सुरुवातीला भक्ष्याला पाडायचा डाव असतो त्यानंतर त्याचा वेग कमी होतो मग जखमी करून मग तो त्याला मारतो. शिकार साधल्यानंतर चित्ता बराच वेळ दम खातो. त्याचे शरीराचे तापमान पाठलागादरम्यान प्रचंड वाढते ते कमी करण्यात बराच वेळ जातो.

चित्त्याच्या पुनर्वसनाचा प्रयत्न


हैदराबाद येथीलकाही भारतीय शास्त्रज्ञांनी इराण मधीलआशियाई चित्त्यांचे क्लोनिंग करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु आशियाई चित्त्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, त्यांची संख्या १०० देखील उरलेली नाही. त्यामुळे आफ्रिकेतील चित्त्यांना आयात करण्यावर विचार चालू आहे

ऐतिहासिक संदर्भ

चित्त्यांचा वापर राजेलोक शिकारींसाठी करतमुघल दरबारातशेकडो चित्ते केवळ शिकारीसाठी पाळले होते याची नोंद आहे. कोल्हापूरच्या दरबारात देखील होते. त्यांच्या शिकारीचे छायाचित्रे शाहू महाराजांच्या संग्रहालयात पहायला मिळतातअकबर राजाकडेजवळजवळ हजार चित्ते होते.

वाघ

वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहेइंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात. मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात. आणि वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे. शिकार केल्यास तो तो मनुष्य दंडास पात्र होतो.

आढळ वसतिस्थान


वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मांचूरिया चीनआग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जातेसंदर्भ हवा ]. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने भारतब्रह्मदेशथायलंडचीन  रशिया यादेशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ (पेंथेरा टायग्रिस) हा मांजर कुटुंब, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. जंगली वाघांतील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत.
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाबहरियाणा हीराज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे उपविभाग आहेत --
1.हिमालय  तराई विभाग - यात जम्मू आणि काश्मीरहिमाचल प्रदेशउत्तरांचलउत्तरप्रदेशबिहारसिक्कीमआसाम अरुणाचल प्रदेश इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
2.   अरवली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. यांत रणथंभोर सरिस्का सारखी राष्ट्रीय उद्याने येतात.
3.   सुंदरबन  ओडिशा .
4.   मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व येथे आढळते. यात कान्हाबांधवगडमेळघाट(गुगमाळ्), ताडोबा यासारखीराष्ट्रीय उद्याने अभयारण्ये येतात.
5.   सह्याद्री  मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतोबंदीपूरमदुमलाई पेरियार इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे-
वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबन मधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री कोकणातील जंगले)

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता २२२६ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृषिपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.

वर्णन

वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वातमोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतोसायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतोसायबेरीयन वाघ हा लांबीला . मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असतेभारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असतेसुमात्रा मधीलवाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणासाचे ठसे वेगळे असतात त्याच प्रमाणे. यावरून वाघांना ओळखता येते. परंतु जंगली वाघ दिसायला मिळणे ही दुर्मिळ घटना असते त्यामुळे ही पद्धत अजूनही ग्राह्य धरलेली नाही. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होतेवाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ते इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वता:ला थंड ठेवतात.

प्रजोत्पादन

वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रीडा ही पहाणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो.[] समागमानंतर काही काळातच नर मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर - बछड्यांना जन्म देते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना सोडून निघून जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. बंदीवासातही वाघांची वीण चांगली होते.

क्षेत्रफळ स्वामित्व

वाघ हाएकटा रहाणारा प्राणीअसून तो आपलेक्षेत्रफळ राखून ठेवतो. नरवाघाचे क्षेत्रफळ ६०ते १०० चौ.किमी असते. नरवाघ आपल्या क्षेत्रफळात अनेकवाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २०चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्याक्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसेकेल्यास होणारे भांडण हेजीवघेणे असू शकते. वाघआपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारेमारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचेओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्यापिल्लांचे देखील अतिक्रमण सहनकरत नाही. परंतुकाही वेळा नरवाघ पित्याची भूमिकादेखील बजावल्याचे आढळलेआहे. जॉर्ज शेलरनेतसेच वाल्मिक थापर<[]. यांनी अश्यागोष्टी नोंदवल्या आहेत.

आहार शिकारपद्धत

वाघ हापूर्णत: मासांहारी प्राणीआहे तसेच वाघाचेशिकारी कौशल्य वादातीत आहे. पूर्ण वाढ झालेलाहत्ती सोडला तरवाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकारकरण्यास समर्थ आहे. वाघाचीमुख्य शिकार मध्यमते मोठ्या आकाराचे प्राणीआहेतसांबर हे वाघाचे सर्वातआवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणीउदारानगवाचितळभेकर  इतर हरणेरानडुक्करनीलगायरानम्हैस इत्यादी आहेत. वाघाचे खाद्यप्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेचगेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामनाटाळण्याचा कल असतो. वाघबहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीनेशिकार केल्याची उदाहरणे आहेत. पिल्ले आपल्या वाढत्या वयातआईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकारकरतात.
वाघांची शिकारीचे तंत्रहे बहुतांशी एकचअसते. वाघ आपलेसावज हेरतात दबा धरून सावजाला कळता जास्तीत जास्तजवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एकदोन ढांगांच्या अंतरावर येतेतेव्हा चपळाईने सावजावर वाघचाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघहीसाधारणपणे ६५ किमी/तासइतक्या वेगाने चालकरून जाऊ शकतो. तसेच वाघाची एकढांग ५ते मीटर पर्यंत जाऊशकते. या वेगाने आपल्या वजनाच्या संवेगाने वाघसावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावाघेण्याचा प्रयत्न करतो श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नयेयासाठी आपल्या नख्यांनी ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत त्यालाधरून ठेवतो. छोट्याप्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचालचका तोडतो यातसावज लगेचच मरूनजाते. अतिशय छोट्यासावजांसाठी वाघाचा पंजाचा एकदणका सावजाची कवटीफ़ुटायला पुरेसा असतो.
भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून झाडाखाली पडतात[]. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्धचंगीज´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटांत आहेत.वाघ शिकार साधल्यावर ती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वलेतरस खासकरून गिधाडे इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात[]. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून आतडी पूर्णपणे बाहेर काढतो लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.सामापत.

नीलगिरि तहर

नीलगिरी तहर नीलगिरी तहर (नीलगिरीटिरगस हिलोक्रिअसहा वन्य प्राणी आहे जो नीलगिरी पर्वत  दक्षिणघाटातील दक्षिणेकडील भाग, तामिळनाडूआणि केरळ, भारतया राज्यांतील दक्षिणेकडीलभागात राहतो, ज्यांचावन्य शेळ्या मेंढ्याशी जवळचा संबंध आहे. याला स्थानिक नखांमध्येनीलगिरी सकिन (आयबॅक्स) किंवाफक्त साकिन असेहीम्हणतात. ही धमकीदेणारी जात आहे

निवास

दक्षिणवस्तीतील घाटातील पर्वतीय पर्वतरांगांचेजंगले हे त्याचेनिवासस्थान आहे. हेकुरण कमी उंचीवरघनदाट जंगलांनी वेढलेलेआहे. पूर्वी यामोठ्या कुरणात ते याकुरणात चरत असत, परंतु एकोणिसाव्या शतकाच्यासुरूवातीला शिकार आणि शिकारकेल्यामुळे, त्यांची संख्या केवळ100 पर्यंत वाढली होती आणिआता ती 2000 झालीआहे आणि म्हणूनचही जात आली. यूसीएनने धमकी दिल्याबद्दलघोषित केले. त्यांचेनिवासस्थान उत्तर ते दक्षिणेस400०० किलोमीटरपर्यंत पसरलेलेआहे आणि इरविकुलमनॅशनल पार्क हीसर्वात मोठी लोकसंख्याआहे.

वर्गीकरण

तामिळभाषेत या नावाचाअर्थ खाईचा बकराआहे, तर अलीकडीलसंशोधनात असे दिसूनआले आहे की, ती बकरीशी संबंधितअधिक मेंढरे आहे. २०० T पर्यंत हेह्यूमेटॅगसच्या आणखी एकतहरी प्रकारात होतेपरंतु आता याप्रजातीला नीलगिरिट्रागस हे नवेनाव देण्यात आलेआहे.

वर्णन

हा एकचिकट प्राणी आहेज्याची त्वचा लहान आणिकोरडी आहे आणिकाटेरी माने आहेत. नर मादीपेक्षा मोठाअसतो आणि प्रौढझाल्यावर तो जाडआणि दाट होतो. दोन्ही लिंगांना शिंगे असतातज्यात वक्र असतात.पुरुषांमध्ये ते 40 सेंटीमीटरपर्यंत पोहोचूशकते तर स्त्रियांमध्येते किंचित लहानअसते आणि तेकेवळ 30 सेंटीमीटरपर्यंत लांब असते. प्रौढ पुरुषांचे वजन40 ते 100 किलो आणिखांद्याची लांबी 100 सेमी पर्यंतअसते. प्रौढ पुरुषांचीमागील बाजू हलकीराखाडी असते, जेणेकरून त्यांनासहज ओळखता येईल.

गेंडा

गेंडा अथवा इंग्रेजीत राईनोसिरोसेस हा प्राणी शाकाहारी भूचर आहे. हा प्राणीगवताळ प्रांतात आढळतो. गेंडा भारतनेपाळ  दक्षिण-पूर्व आशियाई देशातआढळतो. या प्राण्याची दुसरी जात म्हणजे आफ्रिकन गेंडा. नावावरून कळतेकि हि जात आफ्रिका खंडा मध्ये आढळते. आशियात या प्राण्याचा तीनमुख्य जाती आहेत जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा बेटावर आणि वेतनाम देशातआढळतो, दुसरा म्हणजे सुमात्रीयान गेंडा, जोइंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो, आणितिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किवाएक शिंगी गेंडा, जो भारत आणिनेपाळ मध्ये आढळतो. जावन गेंडा हिजात एकेकाळी उत्तर-पूर्व भारतापर्यत आढळतअसे. पण आजते नष्ट झालेआहेत.
भारतात काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीयगेंडे मिळतात. एकशिंगी गेड्यासाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगातील / भारतीय गेंडे काझीरंगा येथेआढळतात. एक शिंगीगेंडे अथवा भारतीयगेंडे भारतात आसामपश्चिम बंगाल  उत्तर प्रदेश मध्येआढळतात, तर काहीप्रमाणात नेपाळ मध्ये पणआढळतात. आफ्रिकन गेन्ड्यामध्ये दोनप्रकार आहेत, पंढरागेंडा आणि काळागेंडा.

इतिहास

इतिहासात, भारतीय गांडा भारतीय उपखंडातीलसंपूर्ण उत्तर भागात आढळला, ज्याला सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रमैदान म्हणतात. तेसिंध, गंगा आणिब्रह्मपुत्र नद्यांच्या मैदानी भागांमध्ये, पाकिस्तान ते भारत-बर्मा सीमेपर्यंत आढळूनआले आणि त्यातनेपाळ, सध्याचे बांगलादेश आणिभूतान यांचा समावेशआहे. असे मानलेजाते की हेबर्मा, दक्षिण चीन आणिइंडोकिनामध्ये देखील फिरते, परंतुहे सिद्ध झालेनाही. 1700 पर्यंत ही जातउत्तर-पश्चिम भारतआणि पाकिस्तानमध्ये सहजपणेदिसून आली, परंतुत्यानंतर लवकरच ती याभागातून नामशेष झाली. इतररहिवासी भागातही ते 00०० ते 00 ०० पर्यंतघसरले आणि विसाव्याशतकाच्या सुरूवातीच्या काळात ते नामशेषहोण्याच्या मार्गावर उभे राहिले.
एका अंदाजानुसार, आज जंगलातफक्त 000००० हूनअधिक भारतीय गेंडाशिल्लक आहेत, त्यापैकी २०००फक्त आसाम, भारतमध्येआढळतात.

सिंह

जगभरात आशियाई किंवाआफ्रिकन या दोन प्रकारचे सिंहआढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हेपूर्वापार भारतातच राहिले असून गेल्याकाही वर्षांपासून तरते गीरपुरतेच उरलेआहेआशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्यभारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे तेआता फक्त गीरजंगलात मिळतात. परंतुकाही संशोधक लेखकांच्या मतेसिंह हा मूळचाभारतातील नसून तो बाहेरून भारतातआणाला गेला त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमीआहे.
वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळातराजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्रविसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आलीहोती, अशी एकआकडेवारी सांगितली जाते. मात्र हीसंख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात तीसंख्या शंभराच्या आसपासहोती. ते काहीहीअसले, तरी १९१०पर्यंतच्या काळात हे संकटओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीतटाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काहीपावले उचलली गेली. गुजरातेतले गीर हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीरकरण्यात आले. गीरमधील सिंहांना आशियाईसिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेहीम्हणतात. आज २०१० सालीगीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१०या काळात ३९८सिंह वाढले.
आफ्रिकेतील जंगलातसिंहांची संख्या खूप जास्तआहे.

आशियाई सिंह पुनर्निवास योजना

या योजनेनुसार कुनो पालपूर या जंगलात गीरचे काही सिंह पुनर्वासित केले जातील. पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे. कुनो पालपूर येथे वाघ असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला. वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगडा असतो आणि वजनदारपण आसतो. कुनो पालपूरला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकतील. पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे गुजरातला काही सिंह आता कुनो पालपूर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे. तरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की या निर्णयाकडे सर्वोच्च न्यालयाने पुन्हा एकदा नजर द्यावी.
सिंह हाजंगलाचा राजा म्हणून ओळखलाजातो.

वर्णन

१५० ते २५०किलो वजनाचा सिंहहा तसा सामाजिक प्राणीआहे. त्याचे अस्तित्व १००००वर्षांपासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते. सिंहाचे दोनप्रकार शिल्लक आहेत आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वीअस्तित्वात असलेले युरोपियन सिंह आणि बारबेरी सिंह हेसिंह आता नामशेषझाले आहेतपांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य१० ते १४वर्ष असते. तेलहान झुडुपाच्या सवानाजंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतोचितळहरीणकाळवीटनीलगायरानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्यआहे. सिंहांना अंदाजेचार प्रयत्नांनंतर एकशिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंहदिवसातील वीस तास झोपतात.
भारताच्या राष्ट्रचिन्हावर चारदिशेला तोंड करूनउभे असलेले चारसिंह आहेत. मुळातहे सिंह राजाअशोकाच्या 'अशोक स्तंभा'वरहोते.
मेट्रो गोल्डविन मेयरया अमेरिकन फिल्मस्टुडियोने बनविलेल्या चित्रपटाची सुरुवात गरजणाऱ्या सिंहाने होत असे.

संस्कृत काव्यातले सिंह

लोकमान्य टिळकांचे वर्तमान पत्राचे नाव'केसरी' हे सिंहाचेच पर्यायी नावआहे. ह्या वर्तमानपत्रावर कधीकाळी असलेला श्लोक :
गजालिश्रेष्ठा ह्यानिबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य करी।
नखाग्रांनी येथे गुरुतर शिलाभेदुनि करीं। भ्रमाने आहेरे गिरिकुहरि हानिद्रित हरी॥ (मूळ जगन्नाथ पंडित, अनुवाद वासुदेवशास्त्री खरे)
यातला झोपलेला सिंहम्हणजे हिंदुस्थानची जनता. आणि मदान्धाक्ष मित्रम्हणजे राज्यकर्ते ब्रिटिश सरकार.
मूळ श्लोक जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलास याकाव्यात आला आहे. तोअसा :
स्थितिं नोरे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:
मराठी समश्लोकी काव्यानुवाद वासुदेवशास्त्री खरे यांचाआहे.

संस्कृत काव्यांतील सिंहासंबंधी काही अन्य श्लोक

. यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना-
गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बा: करिटिन:
लुठन्मुक्ताभारे भवति परलोकं गतवतो
हरेरद्य द्वारे शिव शिवशिवानां कलकल:
ज्यांच्या गंडस्थलांच्या उद्रेकांभोवती भुंग्यांचे थवेगुंजत आहेत असेमत्त हत्तीहि जेथेभीतीमुळे डोळे फिरवीत होतेआणि उभे राहूशकत नव्हते अशासिंहाच्या (हत्तींच्या गंडस्थलातील) मोत्यांनी खचाखच भरलेल्या प्रांगणात आतातो सिंह आतापरलोकी गेल्यामुळे कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकावीलागत आहे. शिव! शिव!
. सिंह: शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु।
प्रकृतिरियं सत्त्ववतां खलु वयस्तेजसो हेतु:
सिंहाचा छावाजरी असला तरीतो मदाने गंडस्थलांच्या भिंतीओल्या झाल्या आहेतअशा हत्तींवर हल्लाकरतो. पराक्रमी पुरुषांचा हास्वभावच असतो. त्यांच्या पराक्रम वयावरअवलंबून नसतो.
.नाभिषेको संस्कार: सिंहस्य क्रियते मृगै:
विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥
सिंहाचा राज्याभिषेक वाअन्य काही संस्कार प्राण्यांकडून केलाजात नाही. पराक्रमाने राज्यमिळविलेल्या त्याचे प्राण्यांवरील राज्यस्वयंसिद्ध असते. वगैरे वगैरे.

Popular Post Links

Kanhaiya Kumar Mocks Giriraj Singh After He Refuses LS Ticket From Begusarai

हमारे "Blog" का मकसद आपके लिए अच्छे article search करके लिखना और लोगो को Motivate करना हैं।

अगर आप को हमारी पोस्ट अच्छी लगती है तोह कमेंट करके

ज़रूर बताएं और अपने दोस्तों के साथ share जरूर करें।

अगर आपके पास हिंदी मैं कोई article , Inspirational Story, News, या जानकारी है जो आप हमारे साथ 

share करना चाहते हैं तो कुर्पया उसे अपनी फोटो के साथ E-mail करे हमारी Id है danishkhan339@gmail.com पसंद आने पर हम आपके नाम के साथ यहाँ Publish करेंगे

Appko Ye Article kaisa laga Comment kar ke zaroor bataine

Important

Agar Apki Koi Shop hai, store hai, shopping portal hai, app hai, Inshorance company, ya ap kisi company ke ajant hai, Hotals hai, bankin suvidha ho, ya banking loan ke bare me, aur anay koi bhi suvidha hai in sab ke alawa aur aap uski Advertisment karna chahte ho toh App hamse contact karsakte hai hame facebook ,facebook group, facebook page, twitter per follow karsakte hain.

Comments

Popular posts from this blog

S S Collection Barshi Takli

डॉ. पंजाबराव देशमुख

BJP Manifesto 2019 & LK Advani